Spread the love

भादा गातेगाव :- { दिपक पाटील }औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले होते. यामुळे हद्दीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता. यावर भादा पोलीस आता ऍकशन मोडमध्ये आले आहेत. काल रात्री भादा ते वडजी जाणारे रोडलागत वडजी शिवारात बालाजी दगडू मुळे यांचे शेतात पत्त्याची/ जुगार शौकिनाची महफील सुरू झाल्याचे माहिती मिळताच भादा पोलिसांनी धाड टाकली आहे.
आरोपी :
. १} आरिफ अहमद पठाण
२} रामानंद लिंबराज हजारे,
३} मोहन वृष्चिकेत गायकवाड
४} बाळू नंदकुमार फरताळे
५} वाजिद मुनवर शेख
६} पोपट सोमनाथ गाडेकर
.७} किशोर चीतानंद चंबर्गे
सर्व राहणार भादा.
८} तानाजी धोंडीराम जाधव
९} बालाजी दगडू मुळे
१०} सुशांत सतिश मुळे
राहणार .वडजी
भादा ते वाडजी जाणारे रोडलागत मौजे वडजी शिवारात,बालाजी दगडू मुळे यांचे शेतात पत्त्याची/जुगार रेड करण्यात आली-
शेतमालकही पत्ते खेळताना मिळून आल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.
एकूण १० आरोपी अटक केले आहेत.
मुद्देमाल -रोख रक्कम, मो. फोन व मो. साहित्य . असा एकूण:४ लाख ३८ हजार ७१०/- रू. माल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीसअधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक, व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, दोलारे, फड,गिरी, कलमे, – क्षिरसागर, – चव्हाण, यांनी हि कामगिरी केली केली आहे. तसेच दुसर्‍या घटनेत त्याच वेळेस गातेगाव पोलीसांनी वांजरखेडा येथे शिवारात तिरट जुगारावर धाड टाकून १ लाख ५ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला , त्यामधील आरोपी {१} प्रशांत निळकंठ कदम {२} सुरेश बब्रूवान वाघ {३} गणेश रामराव कदम {४} राहुल राजाभाऊ कदम {५} हणमंत फुलचंद कदम {६} राजाभाऊ प्रहलाद कदम {७} नानासाहेब रोहीदास कदम {८} हरिभाऊ मुकींदा वाबळे सर्व रा. वांजरखेडा ता.जी लातूर यांच्यावर गातेगाव पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कांबळे, व ईतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!