
लातूर ( दिपक पाटील) : राज्य शासनाने राज्यात गुटखा प्रतिबंधित केलेला असतानासुद्धा जिल्ह्यात गुटख्याची विक्री सर्रास चालू आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने बार्शी रोड, पाण्याच्या टाकी शेजारील हनुमान मंदिराच्या मागील सागर पानमटेरियल येथे बेकायदेशीर गुटखा विक्रीवर धडक कारवाई करत 40 हजार रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त केला आहे.
सागर किराणा येथे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड यांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी सदरील माहिती वरिष्ठाना कळवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने धडक कारवाई करत एकूण 40 हजाराचा गुटखा जप्त करत आरोपीस अटक केली आहे.इरफान हबीब शेख वय ३६ रा.न्यू काजी मोहल्ला लातूर याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं ५७१/२१ ,१८८,२७२,२७३,३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई नंतर गुटखा विकण्यावर वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे.राज्यात मागील काही वर्षांपासून गुटखा बंदी करण्यात आली आहे. तरी काही समाजकंटक गुटखा कर्नाटक मार्गाने आणून राज्यात विकण्याचा प्रयत्नात असतात. या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी प्रशासन सातत्याने कारवाऱ्या करत असून येणाऱ्या काळात अशा आणखी कारवाया होणार असल्याची हे शक्यता वर्तवली जात आहे. सदरील कारवाई अचानक झाल्याने कारवाईला संपूर्ण यश आले आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या बळावर ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणावर गुटक्याचा साठा जप्त केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.सदरील कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, सपोउपनि सर्जेराव जगताप,पोह भिमराव बेल्लाळे,पोना अर्जुन राजपूत यांचा सहभाग होता.
