
अहमदपूर ( भिमराव कांबळे) दि.18सप्टे.2021रोजी अहमदपूर येथील उप. वि. पोलिस अधिकारी कार्यालयं अहमदपूर येथे गणेश विसर्जनात होणारी संभाव्य गर्दी लक्ष्यात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी श्री लंजीले साहेब यांच्या अधयक्षतेखाली शांतता बैठक पार पडली.
अहमदपूर शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, शहरातील नागरिक, अहमदपूर नगर परिषद चे कर्मचारी यांनी या बैठकीला उत्स्फर्तपणे प्रतिसाद दिला .या बैठकीत पो. नि.श्री.लाकाळ , नव्याने रुजू झालेले पो.उप. नि.श्री. शेळके ,पो.उप. नि.श्री केदार तसेच श्री आलापुरे व इतर पो. अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
गणेश विसर्जनासाठी अहमदपूर नगरपरिषद कार्यालय यांच्या कडून आठ ट्रॅक्टर व प्रत्येक ट्रॅक्टर वर चार न.पा. कर्मचारी अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे न.पा. यांच्या कडून सांगण्यात आले गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी दोन विहिरी असल्याचं सांगण्यात आले.
बैठकीत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी लंजिले म्हणाले की, शासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन गणेश मंडळांनी करावे, एकोप्याने विसर्जन करण्यात यावे, अनधिकृत खर्च टाळून त्या पैशात गरजू लोकांना मदत करावी. विसर्जन हे न.पा.ने ठरवून दिलेल्या ट्रॅक्टरने करावे, तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की”देव हा मूर्तीत नसून माणसात आहे” त्यांनी बोलताना श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या सोबत असताना काम केलेल्या काही आठवणी विसरता येत नाहीत हे आवर्जून सांगितले. पोलिस यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री केदार (पो.उप. नि.) यांनी केले.
