
लातूर :- { दिपक पाटील-} दिनांक 03.08.2021 रोजी अन्न व औषध प्रशासन लातूर यांनी गांधी चौक पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी यांच्या सह में. तांबोळी पानमटेरियल, गंजगोलाई लातूर या ठिकाणी भेट घेऊन तपासणी केली असता. सदर ठिकाणी महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठा केल्याचे आढळले. यामध्ये गोल्ड ९०००,राजनिवास पानमसाला, रजनीगंधा पानमसाला व विमल पानमसाला असा एकूण रू. ४५५१५ चा साठा आढळून आला. सदरचा साठा अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम २६(२)(४) नुसार जप्त केला. सदर प्रकरणी हजर व्यक्ती तथा साठा मालक एजाज महेमुद तांबोळी रा. अंबेजोगाई रोड,लातूर यांचे विरूद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे भादंवि कलम 188, 272, 273,. 328 व अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. सहायक आयुक्त तथा पदावधित अधिकारी लातूर श्री दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री विठ्ठल लोंढे यांनी केली. गांधी चौक पोलीस स्टेशन चे श्री देवकते यांनी सहकार्य केले.
