Spread the love


लातूर दि.4 (प्रतिनिधी):- जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागव़ड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमासीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची श्यकता आहे. खोजमासीची प्रौढअवस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान मह्णजेच 2 मी.मी. असते. या कीडीची अंड्यातुन निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगांची असुन हि अंड्यासुन बाहेर पडलेल्या अळ्या प्रथम सोयाबीनची पाने पोखरतात आणि पानांच्या देठातुन झाडाच्या आतील भाग पोखरुन खातात. असा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरुन पाहील्यास आतमध्ये पांढुरक्या रंगाची अली किंवा कोष आढळतो.
या कीडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर 10 ते 15 दिवसाचे पिक असताना झाल्यास, प्रादुर्भाव ग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन कधी कधी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याची सुद्धा काम करु शकते व अशाप्रकारे रोपावस्थेत या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सोयाबीनचे पीक मोठे झाल्यावर या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही. खोडमाशीने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याच्या वजनात घट होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्यापर्यंत घट येऊ शकते. या प्रार्श्र्वभुमीवर सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी पुढील उपाय योजना आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी केले आहे. जेथे या कीडीचा प्रदुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हे. जमिनीत ओल असताना टाकावे. कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडगृस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी प्रति हे. 25 पिवळे चिकट सापळे लावावेत. खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आद्रता, भरपुर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणुन अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या संदर्भात जागरुक राहुन वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत. पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव थायमेथोक्झामची बीजप्रक्रीया केली नसल्यास सोयाबीनचे पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 % – 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 % – 6.7 मिली किंवा chlorantraniliprole 18.5 % – 3.0 मिली प्रती 10 ली. पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!