शिरूर अनंतपाळ {प्रतिनिधी} रयत क्रांती संघटना व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे तहसील कार्यालयावर एकदिवसीय हलकी नाद आंदोलन करून तहसीलदार अतुल जटाळे यांना निवेदन देऊन कळवले आहे.
शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयावर एकदिवसीय हलकी नाद आंदोलन करून शेतकऱ्याच्या विविध मागण्याचे निवेदन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पेठे व तालुक्यातील शेतकरी,उस उत्पादक शेतकरी यांनी दिवसभर तहसील कार्यालय शिरूर अनंतपाळ समोर आंदोलन करून मागण्याचे निवेदन दिले आहे.या निवेदनात सण 2020/21 चा पीक विमा त्वरित मंजूर करावा,2021/22 विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम जमा करावे,ऊस बिल टनाला 2500रु,पहिली उचल द्यावी,चालू थकबाकीदार शेतकऱ्यांना 50 हजार रु,सानुगृह अनुदान बँक खात्यात जमा करावे,शिरूर अनंतपाळ येथे 132 के,व्ही,मंजूर करावे,शिवपूर व धामणगाव येथे उसउत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यासाठी 33 के,व्ही,मंजूर करावे,आशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिरूर अनंतपाळ यांना आंदोलकांनी दिले आहे,या निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पेठे,श्रीधर शिंदे,विनोद कुंभार,गुंडेराव जाधव,प्रल्हाद जलमले,गणेश एलमटे,श्रीरंग पवार, अन्नाराव जाधव,नीलकंठ मुसने,राम जाधव दयानंद कवठाळे,मधुकर जलकोटे आदी शेतकरी व रयत क्रांती चे पदाधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.