Spread the love

लातूर दि.26 ( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठा पाऊस होतो आहे.. धरणातून मांजरा नदीत विसर्ग सुरु आहे. पुढचे दोन दिवस हवामान विभागाने दक्ष राहिला सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भर पावसात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी भाडगाव, रमजानपुर,उमरगा, शिवणी,भातखेडा,बोरी या मांजरा नदी काठच्या गावांना भेटी दिल्या. शिवाराची पाहणी करून तिथल्या नागरिकांशी चर्चा केली.
जिल्ह्यात आज पर्यंत 525 मिमी एवढा पाऊस झाला असून लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा ( धनेगाव) धरण भरले असून त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठच्या गावांना योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. या पाण्यामुळे ज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तात्काळ द्यायच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या आहे. या कामी तालुका प्रशासनाने लक्ष घालण्याचे आदेशही त्यांनी दिले.

आज सकाळी हवामान विभागाने पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हा प्रशासनाचा आपत्ती विभाग पूर्ण सज्ज असून आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या दौऱ्यात सुनिल यादव ,उपविभागीय अधिकारी, राजेश जाधव, नायब तहसीलदार,श्रीमती आरडवाड तालुका कृषी अधिकारी, संजय घाडगे मंडळ अधिकारी, संबंधित गावचे तलाठी, सरपंच यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार प्रशासन काम करत असून वाहत्या नदी, नाले, ओढे यात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!