औसा ( विलास ) औसा तालुक्यातील टाका गावची रहिवासी पूजा कदम या यूपीएससी उर्तीर्ण झाल्यामुळे टाका ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला,भिमाशंकर मंदिरामध्ये ग्रामपंचायत कार्यालय व
विविध विकास सोसायटी टाका यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सत्कार करण्यात आला. सरपंच लक्ष्मी बंडगर, उपसरपंच अतुल शिंदे, विविध विकास सोसायटीचे चेअरमन गोरख सावंत यांच्या हस्ते पूजा कदम यांना शाल, श्रीफळ, पुष्प हार घालून, फेटा घालून सत्कार करण्यात आला त्यावेळी माजी सरपंच संदिपान शेळके, माजी सरपंच रामचंद्र शिंदे , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले ,प्राध्यापक सुधीर पोदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, विलासराव युवा मंचाचे अध्यक्ष रवी पाटील, मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास पाटील ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते .
