
साकोळ ( अजीम ) :- गेल्या दोन चार दिवसापासून सततच्या पावसामुळे साकोळ येथील साकोळ मध्यम प्रकल्प ओव्हरफुल्ल होऊन प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून वाहत असल्यामुळे येथील लेंडी नदिला मोठा पुर आलेला आहे.
या पुराच्या पाण्यात तिपराळ जवळील एका पुलावर चवणहिप्परगा येथील सुनील शेल्लाळे मांसे पकडण्यासाठी गेलेला असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्यामुळे नदीपात्रात वाहून गेलेला आहे.
सुनील राम शेल्लाळे हा चवणहिप्परगा ता. देवणी जि. लातूर येथील रहिवाशी असून त्याचे अंदाजे वय 25 ते 26 वर्ष आहे. सदरील घटना देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे पोलीस स्टेशन देवणीचे पोलीस निरीक्षक सोंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज सिनगारे सदरील बुडालेल्या तरूणाचा तपास करीत आहेत.
लेंडी नदीला मोठ्याप्रमाणात महापूर आल्याने सकाळी 10 ते 11 वाजता बुडालेल्या तरूणाचा दुपारी 3:00 वाजेपर्यंत तर हा तरूण सापडलेला नव्हता. सदरील तरूणाचा शोध लवकारात लवकर घेण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी वडील राम शेल्लाळे यांनी केली आहे.
