साकोळ 🙁 अजीम ) शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विवीध कार्यकारी सेवा सोसायटी द्वारा आयोजीत केलेल्या तालुकास्तरीय कोरोणा योध्दाचा सत्कार साकोळ चे हेड कॉन्स्टेबल स्टेबल. बब्रुवान. तबगाले यांना कोरोणा योद्धा म्हनुन सत्कार ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शि.भ.प.शिवलिंग स्वामी मानखेडकर हे होते.तर प्रमुख पाहुणे मा.ना.संजय बनसोडे ( राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री), मा. अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी ), मा.बस्वराज पाटील नागराळकर ( सरचिटणीस,राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टी ) यांच्या प्रमुख ऊपस्थीती होती. हा कार्यक्रम ढोलताशाच्या गजरात करून येथील बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी मा.कल्याणराव बर्गे ( चेअरमन,विवीध कार्यकारी सेवा सोसायटी, साकोळ तथा ऊपसभापती कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ ) सरपंच कमलाकर मादळे उपसरपंच राजकुमार पाटील यांच्यासह सोसायटीचे सर्वच सन्माननीय सदस्य राजकुमार बर्गे ( तालुकाअध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँंग्रेस पार्टी ),काँंग्रेस,राष्ट्रवादी काँंग्रेस,शिवसेना या महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी,तालुक्यातील कोरोना योध्दा,पत्रकार मित्र,तालुक्यातील सोसायटीचे सर्वच चेअरमन,सरपंच,गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते. या कोरोना योध्दा सत्काराचे अभिनंदन दैनिक देशोन्नतीचे पत्रकार सतिश मल्लाडे, अजीम मुल्ला, पो. हेड कॉन्स्टेबल संदीप तिपराळे, रब्बानी बागवान, लतीफ सौदागर, तसेच सर्व शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
