लातूर दि.28 ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्रासह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊसामुळे तेरणा नदी उजनी औसा जि. लातूर जवळच्या पुलावर एचएफल 0.5 मीटर किंवा त्याहून अधिक वर वाहत आहे. नदीच्या पुलावरील पाण्याची पातळी आणखीन वाढत असल्याने सद्याच्या पुलावर महामार्गावर वाहतूक चालविणे असुरक्षित आहे. त्यामुळे रस्ता वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन पातळी एचएफएलच्या खाली येईपर्यंत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे.
त्यामुळे औसा – तुळजापूर हा चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद करण्यात येत असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नांदेड यांनी कळविले आहे.
