Spread the love

निलंगा { दिपक पाटील} दिनांक 06/10/2021 रोजी निलंगा पोलीस ठाणे येथे गुराळ तालुका निलंगा या ठिकाणी वयोवृद्ध महिला नामे शेषाबाई मोतीराव दूधभाते वय 80 वर्ष या दुपारी दोन वाजता च्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये शेती काम करण्याकरता गेली असता त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने चाकूने त्यांचा गळा कापून खून केला असल्याची माहिती पोलीस स्टेशन निलंगा यांना प्राप्त झाली त्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे पोलीस निरीक्षक शेजाळ सपोनि कुदळे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस उपनिरीक्षक अक्कमवाड पोलीस उपनिरीक्षक मुळीक पोलीस उपनिरीक्षक गर्जे,पोलिस उप निरीक्षक तसेच पोलीस स्टेशनचा स्टॉप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व जखमी हिस उपजिल्हा रुग्णालय निलंगा या ठिकाणी उपचार कामी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी ते तपासून दाखल पूर्व मयत घोषित केले त्यानंतर मयत यांचा मुलगा नामे माधव मोतीराव दूधभाते वय 52 वर्ष व्यवसाय प्राध्यापक राहणार गुराळ तालुका निलंगा ह.मु.मुक्काम पोस्ट सारडा कॉलनी अक्षय गॅस एजन्सी च्या पाठीमागे परळी नाका गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांनी दिलेल्या जबाबा वरून पोलीस स्टेशन निलंगा गुन्हा रजिस्टर नंबर 286/21 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात पाहिजे आरोपीचा शोध डॉग स्कॉड ,फिंगरप्रिंट ,स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चे तीन पथक आरोपीचा शोध घेणे कामी व गोपनीय माहिती काढणे कामे रवाना केले आज दिनांक 9 /10/2021 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून संदीप आनंदा भोसले वय 36 राहणार गुराळ ता. निलंगा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आर्थिक विवेचनातून व पैशाची गरज असल्याने गावातील वयोवृद्ध महिला शेषाबाई दूधभाते तिच्यावर लक्ष ठेवून शेतात एकटी असतांना धार धार हत्याराने गळ्यावर वार करून तिच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोत घेऊन गेला. सदर आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शन लाभले आरोपी शोध कामी निलंगा पोलीस स्टेशन चे अधिकारी उप विभागीय आधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे , पोलीस निरीक्षक शेजाळ ,पोलीस उप निरीक्षक राठोड, अक्कमवाड , मुळीक, गर्जे, क्षिरसागर, व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सूर्यवंशी,अंगद कोतवाड, राजू मस्के, माधव बिल्लापट्टे, नकुल पाटील तसेच पोलीस ठाणे सायबर चे सपोनि श्री. सुरज गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश कंचे,गणेश साठे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील RCP नंबर 01 चे पोलिस जवान यांनी परिश्रम घेतले,सदर गुन्हयाचा तपास निलंगा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शेजाळ हे करीत आहेत. #DSPNEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!