
किनगाव ( प्रतिनिधी )अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील बौध्द स्मशानभूमी व स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे . हे अतिक्रमण काढण्यासाठी गेली २० वर्षापासून बौध्द समाजाची मागणी आसता प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. आज स्मशान – भुमीकडे जाण्यास रस्ता प्रशासनाने खुला करून न दिल्याने अंत्यनिधी न करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला तेंव्हा अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. लेखी आश्वासना नंतर अंत्यविधी करण्यात आला.
..चिखली येथील दलीत समाजासाठी सर्वे न २३३ मध्ये १२ आर जमिन स्मशानभुमीसाठी प्रशासनाच्या रेकॉर्डवर आहे . या स्मशानभुमीसाठी पुर्वी रस्ता होता पंरतू रस्त्यावरील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ताच शिल्लक ठेवला नाही. हे अतिक्रमण काढण्यासाठी हा समाज गेली २० वर्षापासून तक्रारी व निवेदन देवून त्रस्त आहे . अंत्यविधी रोखण्याची ही दूसरी वेळआहे. नाही.चिखली येथील प्रल्हाद ज्ञानोबा वोटले यांचे निधन बुधवारी (दि ६) झाले. जोपर्यंत रस्ता दिला जात नाही तोपर्यंत त्यांचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय समाजाने घेतला .तेंव्हा अधिकारी यांची धावपळ चालू झाली. त्यानंतर अधिकारी यांनी नागरिकांशी संपर्क केला आणि आता अंत्यविधी करून घ्या आम्ही रस्ता काढून देऊ असे सांगितले. मात्र नागरिक ऐकत नसल्याने शेवटी चर्चेतुन मार्ग निघाला व अधिकारी यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान अंत्यविधी करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी आर. व्ही .पट्टेवाड ,मंडळ अधिकारी सुनीता ताटीपामुलवार, तलाठी विजय गडेकर, सपोनि शैलेश बंकवाड,पो.कॉ व्यंकट महाके,ग्रामसेवक सुनिल कांबळे,सरपंच संभाजी गायकवाड व समाज बांधव उपस्थित होते. #DSPNEWS
