Spread the love


औसा ( विलास ) राज्यातील शेतकऱ्यांना ऊसाची एकर कमी एफआरपी द्यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर कारखानदार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सुबुद्धी यावी म्हणून माजी खा. राजु शेट्टी यांनी जागर एफआरपी ची आराधना शक्ति पिठांची या माध्यमातून शेतकरी जागर सुरू केला आहे. केंद्र सरकारने सोयापेंड आयात केल्याने सोयाबीन चे भावही घसरले आहेत. ऊसाची एफआरपी एकरकमी द्यावी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्यहमी भाव द्यावा या मागणी साठी मातोळा ता. औसा येथे शनिवारी दि 9/10 /2021 रोजी सायंकाळी 6 वाजता शेतकरी जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला माजी खासदार राजु शेट्टी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील शेतकरी संघटनेची महाराष्ट्रची मुळुख मैदानी तोफ रविकांत तुपकर आदी मान्यवर उपस्थित राहूण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी शेतकरी बांधवांनी शेतकरी जागर मेळाव्यास जास्तीस जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक माजी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोरे व उस उत्पादक शेतकरी यांनी केली. #DSPNEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!