
उस्मानाबाद :- { प्रतिनिधी } आनंदनगर पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. 275 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 306, 354, 297, 268, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासुन व्यक्तींचे संरक्षण अधिनियम कलम- 5, 6, 7 अंतर्गत दि. 06 ऑक्टोबर रोजी दाखल आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत असून गुन्ह्यातील आरोपी- 1)वसंत छगन काळे 2) संतोष वसंत काळे उर्फ बप्पा 3) नामदेव वसंत काळे, तीघे रा. डिकसळ, ता. कळंब 4)शहाजी राजेंद्र पवार 5) संजय कालिदास काळे 6) बजरंग मोतीराम चव्हाण 7) बप्पा मोतीराम चव्हाण, चौघे रा. दत्तनगर, ढोकी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. 10 ऑक्टोबर रोजी डिकसळ व ढोकी शिवारातून अटक केली असून पुढील कार्यवाहिस्तव आनंदनगर पोलीस ठाण्या च्या ताब्यात दिले असून गुन्ह्यातील त्यांच्या अन्य साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. #DSPNEWS

