
लातूर : { दिपक पाटील} कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणाऱ्या अटो चालक रस्त्यावर सापडलेला मोबाईल रविवारी संबंधित मोबाईल धारकाला परत करत एक आदर्श निर्माण केला आहे. लातूर शहरातील ट्युशन एरीया येथे रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अटोचालक शेख फय्याज जानीमीया रा.हमाल गल्ली लातूर प हे एम.एच २४ ए टी ०५२७ या वाहतूक करीत असताना एक बेवारस मोबाईल फोन सॅमसंग गैलेक्सी ३१ एस हा नजरेस पडला. अटोचालक शेख फय्याज यांनी संबंधित फोन मोबाईलवर कॉल आल्यांनतर मोबाईल धारकाला तुमचा फोन सुरक्षित असल्याचे सांगत ,दामिनी पथकातील महीला कर्मचारी सोनाली ढगे यांच्या समवेत शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे येण्यास सांगितले. सदर मोबाईल मालकीची खात्री पटल्यांनंतर संबंधित मोबाईल हा विवेक महादेव कांबळे रा.सांगली ह.मु. ट्युशन एरीयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असल्याचे उघड झाल्यांनतर त्यांना हा फोन सुपूर्द केला. अटोचालक या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना मोबाईल धारकांनी धन्यवाद दिले. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील व दामिनी पथकातील महिला कर्मचारी सोनाली ढगे यांनी अटोचालकाचा बुके देवून सत्कार केला व त्याच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले. #DSPNEWS
