
लातूर : { दिपक पाटील } बोटावर मोजण्या इतक्याच महिलेच्या घरात किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात किंवा लाॅज वर अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो. गेल्या महिन्यात लोदगा रोडवर एका पञ्याच्या शेडवर चालत असलेल्या वेश्याव्यवसाया वर औसा पोलिसांनी धाड टाकून तीन महिलांची सुटका केली होती , लातूर शहरातील अनेक ठिकाणी हा धंदा तेजीत आहे ,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री करायला पाहीजेत. या प्रकरणात आता औसा येथील नगराध्यक्ष अफसर शेख यांनी ग्रहमंञी दिलीप वळसे पाटलांना पञ देत साकडे घातले आहे, कारण लातूर ची जशी परिस्थीती आहे तसेच औसा येथील आहे, येथील लाॅज वर वेश्याव्यवसाय चालतो असे नगराध्यक्ष सांगतात, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची अवैध धंद्यावर आपला धाक जमवला आहे व अवैध धंद्येवाल्याला सळो की पळो करून सोडले आहे, पण त्यांचे इकडे पण लक्ष देण्याची गरज आहे ,अडचणीतील महिलांना पैशाचे आमिष दाखवून हे लोक महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात, शारीरिक पिळवणूक करून त्यांच्या कमाईवर स्वत:ची उपजीविका करीत असल्याचे काही सुजाण नागरिक सांगत आहेत . सभ्य लोकांच्या वसाहतीत कुंटणखाना सुरू असल्याचे चित्र सद्यःस्थितीत पहावयास मिळत आहेत , त्यातील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवरुन वेश्याव्यवसाय ठिकाण ची माहिती सांगितली आहेत . १} वैभव नगर २} चौधरी नगर,३} प्रकाश नगर ४}एमआयटी महाविद्यालय पाठीमागील बाजूस ५} म्हाडा काॅलनी ६}अवंती नगर ७} काॅक्सीट महाविद्यालय पाठीमागील बाजूस ८} कळंब रोड ९} पाखरसांगवी रोड १० } नंदी स्टॉप ११} जुना औसा रोड, या परिसरातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अडचणींमुळे वाढतोय वेश्या व्यवसाय मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट पूर्णपणे हद्दपार झालेले नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केल्याने अनेकांसमोरील विशेषत: हातावरील पोट असलेल्यांच्या अडचणी वाढल्या. अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर अनेकांचा रोजगार गेला. या पार्श्वभूमीवर पैसे मिळविण्यासाठी वेश्या व्यवसाय वाढू लागल्याचे सूत्रांनी सांगितले. #DSPNEWS
