Spread the love

औसा ( प्रतिनिधी ) :- उमरगा लातूर राज्यमार्गावरील लामजना प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र ते समाजकल्याण वसतिगृहाच्या अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पथदिवे बसवण्यात आली आहेत.
परंतू अद्यापही ती सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

लामजना गावानजीक रस्ता दुभाजक तयार करून पथदिवे लावण्यात आली आहेत.त्यामुळे लामजना गावच्या सौंदर्यात भर पडत आहे पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांची आणि दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

लातूर उमरगा राज्यमार्गावरील लामजना गावातील पथदिवे चालू करण्याकडे संबंधित गुत्तेदारांचे दुर्लक्ष का ? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
नागरिकांची, दुचाकीस्वारांची गैरसोय टाळण्यासाठी लामजना मुख्य रस्त्यावरील पथदिवे लवकरात लवकर चालू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. #DSPNEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!