Spread the love

औसा – ( प्रतिनिधी) लामजना येथे प्रशासकाच्या कार्यकाळात वीत्त आयोग फंडातून आठवडी बाजारात येणा-या व्यापारी, शेतकरी, नागरिक व दोन्ही बॅकेच्या ग्राहकांसाठी, विशेष महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले. शौचालयाचे बांधकाम पुर्ण होऊन चार महिने उलटून गेली माञ शौचालयास अद्यापही टाळेच आहे.
यामुळे आठवठी बाजाराला येणा-या शेतकरी, व्यापारी, ग्राहक व दोन्ही बॅकेत येणा-या खातेदार ग्राहक, विशेष महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
शौचालयाच्या बाजूस पाण्याच्या सोयीसाठी पाण्याचा हौद बांधण्यात आले माञ तो हौद कोरडाच असून त्यात पाणीच उपलब्ध नाही.

नियमित हौदात पाणी भरले जावे व शौचालय वापरण्यास लवकर उघडले जावे अशी मागणी आठवडी बाजार व बॅकेत येणारे शेतकरी, व्यापारी, ग्राहक महिला करत आहेत.
तरी ग्राम पंचायतने नागरिकांच्या वरील समस्यांची लवकरात लवकर दख्खल घेऊन शौचालय वापरण्यास उघडे करुन नागरिक व वरील सर्वांची सोय करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!