
लोनावळा :- { प्रतिनिधी} महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्यस्तरीय बैठक लोनावळा येथे संपन्न झाली. ३२ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर दोन वर्षाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर २६~११ च्या हल्ल्यात वीरमरण आलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच ईतर अनेक प्रश्नांवर चर्चा करून कार्यक्रम कसे राबवण्यात येतील असे देखील सांगण्यात आले, प्रत्येक जिल्ह्यांमधील जिल्हा अध्यक्ष यांना स्वतःहून जे जे आतापर्यंत कार्य केले ह्या दोन वर्षात ते सांगण्यात आले. त्यावेळी संघटनेच्या बैठकीला लोणावळा पोलीस निरीक्षक पवार ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक जाधव हे देखील उपस्थित होते व लातूर जिल्हा अध्यक्ष संतोष पारडे उपाध्यक्ष साजिद शेख हे देखील या कार्यक्रमाला हजर होते.
