Spread the love

लातूर :- { दिपक पाटील } जिल्ह्यातील अनेक युवक सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि नंतर व्हीडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. जिल्ह्य़ातील पीडित वर्ग या प्रकरणी बदनामी पोटी पोलिसात तक्रारही दाखल करत नाहीत.
आधी एका अनोळखी मुलीचा फेसबुक मॅसेज वर मॅसेज करून व्हॉटस्अप नंबर घेऊन WhatsApp वर Hello मॅसेज येतो. DP वर सुंदर मुलीचा फोटो असतो आणि सुंदर मुलीचा मॅसेज बघून तरुण मुलं असो किंवा इतर कोणी पुरुष त्याने त्या मॅसेजचा रिप्लाय दिला की मग सुरू होते मैत्री, अश्लील व तरुणांना उत्तेजित करणारे मॅसेज. यानंतर Video कॉल करून अश्लील हावभाव करुन तरूणांना घायाळ करीत स्वत: निर्वस्त्र होऊन तरूणाला देखील निर्वस्त्र होण्यास भाग पाडते. त्यानंतर हा व्हीडिओ कॉल रेकार्ड करून त्याचा वापर तरूणांकडून पैसे उकळण्यासाठी केला जातो. दरम्यान, ती तरुणी एवढ्यावरच थांबत नाही तर तिचे सहकारी पोलीस असल्याची बतावणी करीत संबंधित तरुणांना कॉल करतात आणि तरूणीने तक्रार दाखल केल्याचे सांगतात आणि संबंधित व्यक्तीकडून पैशाची मागणी करतात.
दरम्यान, या प्रकरणात अनेक तरूण अडकले आहेत. महाराष्ट्रात अश्या तरूणांचा आकडा मोठा असल्याचे बोलले जात आहे. बदनामीचा भीतीने तरूणांनी पोलिसांकडेही पाठ फिरविली आणि तरुणीला पैसे दिले असल्याचं समजतं आहे.
या प्रकाराने तरूण मुलं मानसिकरीत्या खचून जात आहेत. अश्यात जिल्ह्य़ातील तरूणाने व पिडीत लोकांनी सबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पाहिजेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!