किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील ग्रामपंचायतीत अनेक गैरव्यवहार झालेले आहेत याची चौकशी करावी यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब व मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देवून सुद्धा कोणतीच कार्यवाही होत नाही यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण होत आहे कारण गावात दोन ते तीन वर्षे झाली पाणी नाही लोकांचे प्रचंड हाल होत आहेत आणि गावातील ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदश्य पुढील निवडणुका लक्षात ठेवून जवळच्या लोकांचे जॉब कार्ड अपडेट करत आहेत ज्यांचे आतापर्यंत जॉब कार्ड अपडेट केले आहेत त्यात त्यांना पक्के घर आहेत अशाची व जुनी यादीत 143 नावे होती आणि आता 134 आहेत या नवीन यादीत नवीन नाव दाखल केलेली दिसत आहेत यात मोठया प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण झालेली आहे असे लोकांचे म्हणणे आहे दगडवाडी ग्रामपंचात मधील ग्रामसेवक हा आर्थिक बाबीला बळी पडून कायद्याच्या चाकोरीबाहेर जाऊन काम करत आहे व त्यास विस्तार अधिकारी पट्टेवाड पाठीशी घालत आहेत. या ग्रामसेवकाची बदली करावी अशी मागणी जोर धरत आहे.
