औसा :- { दिपक पाटील } विस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने येथील एका लाॅज मधील प्रेमी युगलाला मारहाण आणि त्यांचे ओळखपञ पळवल्याचा धक्कादायक प्रकार औसा येथे घडला आहे . काल दिनांक २७~१२~२०२१ दुपारी १२ ते १ च्या दरम्यान तेथील तथाकथित सामाजिक संघटनेचा नावाखाली एका नगरसेवकांसह त्या टोळक्याने त्या लाॅज वर जाऊन व्यवस्थापक ला रूम उघडण्यास भाग पाडले , आत मधील प्रेमी युगल बाहेर येताच तथाकथित लोकांचा पारा चढला, त्यांनी प्रेमी युगलासह व्यवस्थापकालाही मारहाण केली, त्याच दरम्यान व्यवस्थापकाने सदरील लाॅज मालकास मोबाईल फोन द्वारे घडत असलेला प्रकार सांगितला, ताबडतोब लाॅज मालकाने औसा पोलीसांना पाचारण केले असता, पोलीसांनी चौकशी करून प्रेमी युगलाचे वय कायदेशीर बसत असल्याने त्यांना सोडून दिले, या सर्व घडामोडींत प्रेमी युगलाचे ओळखपञ त्या तथाकथित समाज संघटने कडे असल्याचे सांगण्यात येत आहे, पण मुळात या करीता पोलीस यंञना सक्षम असताना, पोलीस यंत्रणा मध्ये ए.एच.टी.यू. व दामिनी पथक आपले काम जबाबदारीने पार पाडत असताना, पोलीसांना न सांगता तथाकथित संघटने चे लोक एका लाॅज वर छापा टाकण्या मागचा त्यांचा हेतू काय होता ? प्रेमी युगलाला व व्यवस्थापकाला मारहाण करण्यास कोणी सांगीतले ? आता पर्यंत किती प्रेमी युगलाला यांनी मारहाण केली आहे, त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात का आली नाही ? का लोकांचा पोलिस प्रशासनावर विश्वास राहीला नाही ? याचा शोध पोलिसांनी घेतला पाहीजेत .
