
फिल्मी स्टाईल चोर पकडला पण तो अट्टल दरोडेखोर निघाला.
न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कस्टडी.
किल्लारी ( प्रतिनिधी ) पूणे,अहमदनगर, सह बिड जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे करुण मोकाट असलेल्या अट्टल दरोडेखोरास एका महीलेसह पोलिसांनी एका चोरी प्रकरणात पाठलाग करुन पकडले.
मिळालेली माहिती अशी की, तुकाराम अशोक पांचाळ रा.पैठण ता.केज जिल्हा बिड हा आरोपी किल्लारीच्या आठवडी बाजारात एका महिलेसह फिरत होता त्यांनी गर्दी चा फायदा घेत बाजारातील दोन मोबाईल चोरले त्यात एक विवो व दूसरा नोकिया कंपणीचा असे १६२०० रू किंमतीचे मोबाईल चोरले यावेळी उपस्थित लोकांनी त्याला रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला ही माहिती पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी तात्काळ आपल्या चमूसह नाकाबंदी करुन आरोपीचा पाठलाग करुन त्यास किल्लारी परिसरात पकडले.पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलिसही चक्रावले तो अट्टल आरोपी बिड जिल्ह्यातील असून त्याच्यावर यापूर्वी अहमदनगर एम.आय.डी.सी.पोलिसात २९७/२०१९,कलम ३९५ तसेच नेकनूर पोलीस स्टेशन बिड४६/२०१६,कलम ३९५,दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण९९७/२०१७ कलम ३९९,४०२ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात कारमा नागराज पासरा रा नावदूर ता. संगारेड्डी या महीलेसह किल्लारी पोलिसांच्या तावडीत सापडला योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रं. नं.२६४/२०२१ कलम ३७९ भा.द.वी.प्रमाणे नोंद करुन त्यास न्यायालयापुढे हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली असून आरोपी पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,डि.वाय.एस.पी.मधूकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील गायकवाड पि.एस.आय रंजीत काथवटे बिट अमलदार गौतम भोळे,आबासाहेब इंगळे दत्तात्रय गायकवाड हवालदार किंबळे चालक मुळे यांनी कामगिरी बजावली.
