कोटी रुपयाची योजना मंजूर असून काम अपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष
किनगाव🙁 प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील गावातील लोकांचे पाण्यामुळे 4 वर्षांपासून हाल होत आहेत अशा पावसाळ्यात सर्व तलाव पूर्ण भरलेली आहेत पण या गावातील महिलांना 2 किमी वरून पाणी आणत आहेत त्यामुळे ह्या महिलांना आजार होत आहेत पण प्रशासन व ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचे याकडे लक्ष नाही. उलट गावला अधिग्रहण मंजूर करून पाणी देण्यात यावे असे गावातील लोकांचे म्हणणे आहे. तसेच रामवाडी ते दगडवाडी पाईप लाईन योजना मंजूर झाली होती, नळ योजनेचे अंदाजे रक्कम 4 कोटी रुपये होते,परंतु ते काम पूर्ण झालेले नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्या ठेकेदारा वरती कोणतीच कार्यवाही होत नाही. तरी याची उचित कार्यवाही केली नाही, तर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
