किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावात प्रधानमंत्री आवास योजनेत अनेक अफरातफर झाली आहे, त्याची चौकशी करणे कामी मा पट्टेवाड साहेब यांनी सांगितल्यानुसार समिती नेमली होती ती समिती गावात न येताच उलट गावातील ग्रामसेवक व डाटा ऑपरेटर जवळच्या लोकांचे कागदपत्र गोळा करत आहे.करोना काळात गावातील लोक जमा करून मी तुम्हाला घरकुल आणून देतो असे म्हणत आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे ते म्हणत आहेत की गावाच्या समोर सर्व लोकांनां बोलवून नवीन यादी बनवावी जुन्या यादीमध्ये अनेक अफरातफरी आहेत ती रद्द करण्यात यावी नाहीतर उपोषणाचा इशारा दिला आहे.
