Spread the love

भारत माता की जयच्या निनादात रस्ते फुलले

लातूर दि. 14 ( प्रतिनिधी ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत असून आज सकाळी रात्रंदिवस सुरक्षिततेसाठी झटणारे हात.. समाजात एकता नंदावी यासाठी दीड हजार पोलीस ” एकता दौड” मध्ये धावले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यशवंत विद्यालय, नांदेड रोड येथून ” एकता दौड” ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस उपाधीक्षक सूडके, पोलीस अधिकारी, यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापक डॉ.सुवर्णा जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ही दौड विवेकानंद चौक, शाहू चौक, गंज गोलाई, सुभाष चौक, जुना रेणापूर नाका, शिवाजी चौक, गांधी चौक, जुने गुळ मार्केट, परत यशवंत महाविद्यालय येथे या दौडची समाप्ती झाली.
रस्ते फुलले
तीन लाईन मध्ये अत्यंत शिस्तीत… यशवंत विद्यालयातून निघालेले दीड हजार पोलीस… धावण्याची लय कायम ठेवत… अधून मधून उत्साह वाढविणाऱ्या ” भारत माता की जय, ” ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” च्या घोषणा देत.. काही ठिकाणी दुतर्फा थांबून लोकांनी टाळ्या वाजवत प्रोत्साहनही दिले. या दौड मुळे कमी वाहतूक असलेले रस्ते या घोषणानी फुलून गेले होते.
वृक्षारोपण
ही दौड सुरु होण्याच्या पूर्वी यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!