
औसा – दि १५ { दिपक पाटील} श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे आज स्वतंत्र दिना निमित्त श्री विठ्ठल-रूक्मीणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा चे अध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी महाविद्यालयाच्या वतिने शिक्षण महर्षी माजी आमदार कै सिद्रामप्पा आलुरे गुरूजी यांना भावपूर्ण श्रध्दाजली वाहण्यात आली.
महाविद्यालयातील प्राध्यापक श्री बळवंत घोगरे यांना पीएचडी पदवी मिळाल्याबदल त्यांचा महाविद्यालयाच्या वतिने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री बाबुप्पा उटगे व श्री बसवराज वळसंगे, सचिव श्री गिरीष पाटील, सहसचिव श्री सुभाषप्पा मुक्ता, कोषाध्यक्ष श्री भानुदास डोके, विश्वस्त श्री सुर्यभान जाधव, राजु बिराजदार, ॲड अरविंद कुलकर्णी, श्री मच्छींद्रनाथ महाराज, श्री शेषेराव पाटील, श्री सिद्रामप्पा मिटकरी, ह.भ.प. श्री श्रीरंग महाराज, औसाचे माजी नगराध्यक्ष श्री सुनिलप्पा मिटकरी, प्राचार्य श्री बेटकर सर,उपप्राचार्य श्री मिसाळ सर, श्री आलुरे सर, श्री खानापुरे सर, अमृत पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
