Spread the love

लातूर,दि.16 (प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्‍या गळीत धन्ये संशोधन केंद्र, लातूर येथे जाऊन सोयाबीन पीक पाहणी, सोयाबीन पिकावर कीड लागू नये व शेतीतील कामे जलद गतीने होण्यासाठी ड्रोन यंत्राद्वारे फवारणी, तसेच चिकुंद्रा येथील संगिता संदीपन घाडगे यांच्या शेतातील सेंद्रीय शेती आणि सोयाबीन पिकाची पाहणी कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केली.
यावेळी परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, उपविभागीय कृषि अधिकारी आर.एस.कदम,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस.गावसाने, नायब तहसीलदार राजेश जाधव, तालुका कृषि अधिकारी हरिराम नागरगोजे मंडळ कृषि अधिकारी श्री.बावगे, बालाजी रेड्डी, नामदेव चाळक, सचिन दाने, प्रविण मगर, कोंडीराम काळे, उपस्थित होते.
यावेळी कृषि मंत्री भुसे शेतक-यांना बोलतांना म्हणाले की, सोयाबीन पीक घेणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञनाच्या आधारे शेती करुन चांगले पीक घेऊन आर्थिक उन्नती करावी. कृषि विषयक शासकीय योजनेत महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी विम्याचे नियम बदलण्याविषयक कार्यवाही शासन स्तरावरुन सुरु आहे. तसेच त्यांनी शेतामध्ये काम करणाऱ्या महिला कामगार मजूरांशी संवाद साधून त्या अडीअडचणी जाणून घेतल्या व संबंधितांना योग्‍य त्या सूचना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
यावेळी चिकुंद्रा येथील सरपंच रंजना हनुमंत कदम, कृषि सहायक श्रीमती विश्वकर्मा, मंडळ अधिकारी टी. चव्हाण, तलाठी श्री.सुनिल लाडके, पोलीस पाटील राजकुमार कुंभार, उपसरपंच अमर हरिश्चंद्र घाडगे, विजय दत्तोबा घाडगे, सौ.संगिता संदीपान घाडगे, निजाम गुलाब शेख, औंदूबर घाडगे, श्रीकांत लोखंडे, रविंद्र काळे, संतोष जगताप, विश्वास कदम, सुरेश कदम यांच्यासह मोठया संख्येने अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!