
औसा { प्रतिनिधी } – औसा तालुक्यातील गाडवेवाडी येथे दिनांक १७ ऑगस्ट रोजी अंगणवाडी परिक्षेत्रात वृक्षारोपण पार पडले.मा विभागीय आयुक्त औरंगाबाद एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या आदेशानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प औसा अंतर्गत औसा तालुक्यातील गाढवेवाडी येथील अंगणवाडी कार्यक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत अंगणवाडी कार्यक्षेत्रात चिंचेची झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाढवे , अंगणवाडी सेविका सुपरवायझर शशिकला भोसले ,अंगणवाडी सेविका लताबाई कांबळे ,छबाबाई खरोसे, रेखा भारती ,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चेतन चव्हाण , दिलीप काकडे, शिलाबाई गाढवे ,सुदामती बोमने , पंचुबाई गाढवे यांच्यासह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.
