
यवतमाळ :– पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना प्रमोद वाघमारे यांनी हे निवेदन दिले आहे, या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी दिनांक 13 / 08 / 2021 रोजी कटोरा नाका , रिंगरोड परिसरातील गोल्डन लीप मंगल कार्यालया समोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी दिनांक 15 / 08 / 2021 रोजी पीएसआय अनिल मुळे यांची फोनवर रडत बोललेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडिया द्वारे सगळीकडे व्हायरल झाली असून ही ऑडिओ क्लिप ऐकल्या नंतर असे दिसून आले आहे की, पीएसआय अनिल मुळे यांच्यावर खूपच मोठा अन्याय झाला आहे
त्यामुळे गृहमंत्री साहेबांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्वतः जातीने लक्ष घालून व सखोल चौकशी करून या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे संपूर्ण राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
हे निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष शाहेदभाई सय्यद , विधी सल्लागार विदर्भ अध्यक्षा ऍड.रजनीताई देवतळे , यवतमाळ महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पनाताई नागभीडकर यांची उपस्थिती होती
