किनगांव ( प्रतिनिधी ) किनगांव पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले गजानन अन्सापूरे यांच्या बदलीचा आदेश पोलिस आस्थापना यांच्याकडून निघाल्याने मनाला चटका लागल्याची भावना किनगांव परिसरातीत लोकाच्या मनात आहे किनगाव साठी लाभलेला हा अधिकारी खाकी वर्दीतील देव माणूस आम्हाला भेटला होता आम्हाला भरपूर मदत केली , गोर गरीब जनतेची सेवा करणारा माणूस आम्हाला भेटणं शक्य नाही , किनगाव पोलीस स्टेशन चे नाव अख्खा लातूर जिल्ह्यात केलं किनगाव पोलिस स्टेशन आणि आमच्या भागातील खरा हिरा आम्ही गमावला , नांदेड येथे तुमची बदली झाली तिथल्या स्थानिक लोकांचे काही तरी पुण्य असेल जेणेकरून तुमच्या सारखा समाज सेवक पोलीस अधिकारी त्यांना मिळाला , तुम्ही आमच्या जीवनाचा एक भाग म्हणूनच रहाल , तुमच्या बदल लिहलं तेवढं कमीच आहे आपल्या कार्यरूपी सेवेला सलाम .
