
किनगाव (प्रतिनिधी) : किनगांव येथील मुख्य रस्त्यात खड्डे पडले होते.त्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होत होता.त्याचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी या साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक कागदाची नाव सोडून गांधी गिरी मार्गने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.येथील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते व सध्या पावसाळा असल्याने त्या खड्यात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते त्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत होता.याची दखल घेउन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्डयात नाव सोडून गांधी गिरी मार्गाने आदोलन करताच संबंधित अधिकाऱ्यांना जाग आली व लागलीच मुख्य रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात करून गावकऱ्यांची अडचणी दूर केली.यावेळी गणेश पांचाळ शिवसेना तालुका उपप्रमुख रतन सौदागर पंडित बोडके जाकेर कुरेशी आदिजन उपस्थित होते.

