चाकूर {प्रतिनिधी} : चाकूर येथील सीमा सुरक्षा दल सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात महानिरीक्षक प्रवीण राठोड, वरिष्ठ कमान अधिकारी संदीप रावत, विठ्ठल कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इनर व्हिल क्लब चाकूर व जन शिक्षण संस्था लातूर यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी तीन हजार राखी जवानांना भेट देण्यात आली. कुटुंबियांपासून दूर राहत देश सेवा करणाऱ्या जवानांठी इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर च्या वतीने ‘एक राखी देशसेवेतील जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उप कमांडन्ट श्रीधर निकम, सहाय्यक कमांडन्ट डॉ.विनोद तांदळे, सहाय्यक कमांडन्ट डॉ.चेतन पाखले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी जवानांना इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर व जन शिक्षण संस्था लातूर यांच्या वतीने राखी बांधण्यात आली. यावर्षी जन शिक्षण संस्थेच्या वतीने पाच हजार राख्या बनवण्यात आल्या त्यातील तीन हजार राख्या सीमा सुरक्षा दलातील जवानांना भेट देण्यात आल्या. यावेळी जन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर फुलारी, इनर व्हिल क्लब च्या अध्यक्षा डॉ.अंजली स्वामी, सचिव शारदा अंतुरे, प्रभावती मोतीपवळे, मीना हक्के, सुषमा सोनटक्के, वंदना सावंत, उषा महालिंगे, लक्ष्मीबाई काटे, सरपंच वसुंधरा मुंढे, रागिणी शिंदे, रत्नमाला नंदगावळे, सुनीता कुलकर्णी, साधना कुलकर्णी, राजश्री साळी यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या. जवानांनी ओवाळणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा भेट दिला. देशसेवा, त्याग व समर्पण याबद्दल शारदा अंतुरे, प्रभावती मोतीपवळे, शितल मिरजकर यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.