
किनगाव (प्रतिनिधी) शेतात रान डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तारेचे कुंपण करून त्यात विद्युतप्रवाह सोडण्यात आला होता.दरम्यान या तारेचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सांगवी तांडा येथे घडली आहे.याबाबत किनगाव पोलिस स्टेशनला घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले अहमदपूर तालुक्यातील सांगवी तांडा शिवारातील उभ्या पिकाचे रानडुक्कर मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.त्याचा करण्यासाठी ऊसाच्या शेतीत तारेची व्यवस्था करण्यात आली होती.दरम्यान त्या तारेमध्ये विजप्रवास सोडण्यात आला होता.रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास धोंडीराम राठोड यांच्या शेतात घरातील पशूधनासाठी वैरण आणण्यासाठी तुकाराम शिवाजी चव्हाण वय वर्षे (50) गेले होते.त्यावेळी त्यांना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेचा स्पर्श झाला.यामध्ये बसलेल्या वीजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
