
किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालूक्यात किनगाव हे मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेबद्ल गोरगरीबांचे कैवारी डॉ.प्रमोद सांगवीकर यांचा सत्कार करण्यात आला. कारण किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी अति जोखिाम अवस्थेतील मातेची यशस्वी प्रस्तुती केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या किनगाव येथील रहिवाशी शेख शबाना हुसेन या मातेची डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी यशस्वी प्रसुती केली आहे. प्रसुतीसाठी आलेल्या शेख शबाना या मातेची सोनोग्राफी केली असता पोटामध्ये बाळाचे आतडी बाहेर आहेत असा रिपोर्ट आला होता. मातेच्या पोटामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित झाली नव्हती. आशा जोखिमेच्या प्रसुतीची जिम्मेदारी डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी घेतली आणि यशस्वीरित्या नॉर्मल पद्धतीने प्रसुती करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
यावेळी मातेचे सासरे शेख इस्माईल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, जेंव्हा नवव्या महिण्यामध्ये आम्ही मातेची सोनोग्राफी केली होती तेंव्हा मातेच्या पोटामध्येच बाळाचे आतडी बाहेर आल्याचे आम्हाला समजले होते तसेच बाळ मातेच्या पोटामध्ये व्यवस्थित वाढले नाही. डीलिव्हरी नॉर्मल होणे अवघड आहे. तसेच बाळ आईच्या पोटामध्ये कदाचित मृत आहे याची आम्हाला माहिती होती पंरतु आमची खुप गरीबी परिस्थीती असल्या कारणाने आम्ही लातुर किंवा मोठ्या शहरात जावू शकत नव्हतो. बाळाची जगण्याची शाश्वती नव्हती परंतु मातेला वाचवण्यासाठी आमचा अठ्ठाहास होता. जर मोठ्या शहरात आम्ही गेलो असतो तर आम्हाला एक लाखाच्या जवळ जवळ खर्च आला असता. मातेचे सिझर केल्याशिवाय पर्याय नाही अशी भिती आम्हाला काही जणांकडून घालण्यात आली होती. मात्र डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी आम्हाला धिर दिला आणि यशस्वी रित्या नॉर्मल प्रसुती करुन मातेचा जीव वाचविला. देवाच्या रुपात आम्हाला डॉ. सांगवीकर भेटले असेही शेख ईस्माईल यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले. यशस्वी प्रसुती करण्यासाठी परिचारीका बनसोडे, रेखा भालेराव, आशा ढाकणे, सुवर्णा लटपटे, श्रीमती अनुसया कांबळे, तीर्थंकर श्रीकांत यांनी परिश्रम घेतले. अशी गुंतागुंतीची अवघड प्रसुती यशस्वी रित्या केल्याबद्दल शासकीय रुग्णालयाबद्दल व येथील डॉक्टर्स, नर्स यांच्याबद्दल अहमदपूर भाजपा अल्पसंख्याक युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष फेरोज भाई गुत्तेदार,मोसोन शेख, सोहेल जावकर, आयान पठाण, अनवर बागवान, बंडू श्रंगारे, बालाजी चाटे, यासीन शेख, अनवर तांबोळी,नविद तांबोळी, मोईन शेख, वजीर शेख व त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांचे कौतुक करून नागरीकांतुन समाधान व्यक्त होत आहे.
