
किनगाव(प्रतिनिधी) किनगाव पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे अन्सापुरे साहेब यांची प्रशासकीय बदली नांदेड येथे झाली आहे ही बातमी समजताच किनगाव परिसरातील सामान्य नागरिकांना धक्का पोहचला आहे की कारण या माणसाने अगदी कमी कालावधीतच अवैध धंदे वाल्याचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे या परिसरात कायदा व्यवस्था सुरळीत चालू होती. त्यात आत्ताच आलेले बंकवाड साहेब सहायक पोलीस निरीक्षक या दोघामुळे किनगाव परिसरात चांगले वातावरण निर्माण झाले होते, पण पोलिस उपनिरीक्षक अन्सापुरे साहेबांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे या परिसरातून असाच दुसरा अधिकारी आमच्या किनगाव पोलीस स्टेशनला अधिकारी पाठवावेत, अशी मागणी होत आहे याबद्दल भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष फिरोजभाई गुत्तेदार व मित्र मंडळ यांनी पोलिस उपनरीक्षक अन्सापुरे साहेबांचा सत्कार करून मा एस पी साहेबांकडे मागणी केली आहे.
