Spread the love

वैद्यकीय पथक आलं अन परत गेलं

बेलकुंड मध्ये एकाच घरात आढळले सहा कोरोना रुग्ण, कोरोना तपासणीच्या भीतीपोटी शेजारी घराला कुलूप लावून शेताकडे रवाना
औसा (प्रतिनिधी ) औसा तालुक्यातील बेलकुंड येथील एकाच घरातील काल तीन तर आज तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली या कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो म्हणून शेजारील व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला नकार देत अनेकजण चक्क गायब झाल्याने रिकाम्या हातानं वैद्यकीय पथकाला परतावं लागल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय यावेळी घटनास्थळी पोलीस वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दाखल झाले पण नाईलाजाने ते सुद्धा हतबल होऊन परतले आहेत

गेल्या महिन्यात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील माळुंब्रा येथे 48 कोरोना रूग्ण सापडले यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेज होतो की काय अशी भिती निर्माण झाली होती पण या गावाजवळील बेलकुंड गावात काल आणि आज दोन दिवसांत 6 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाने आपले डोके वर काढले आहेत चित्र दिसत आहे बेलकुंड येथे गेल्या दोन दिवसांपासून एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना बाधित आढळले. मजुरी करण्यासाठी त्या कुटुंबातील एक महिला एकंबी, चिंचोली आणि उजनी येथे कोथिंबीर काढण्यासाठी मजूरीने गेली होती प्रथम ती महिला पॉझिटिव्ह निघाली त्यांच्यानंतर दोन दिवसात त्या घरचे आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले लातूर येथील कोव्हिड सेंटरला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्र बेलकुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अमजद पठाण यांनी येवून त्या कुटुंबाची कोव्हिड चाचणी घेवून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले तसेच आज कोरोना रुग्ण सापडलेल्या घराजवळील शेजारी यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व डॉक्टर आले होते तेव्हा आरोग्य विभागाची रुग्णवाहिका बघून त्यांनी घराला कुलूप लावून सर्व शेजारी शेताकडे व बाहेर गेले शेजारी पाजारी तपासणी करून घेत नाहीत म्हणून पोलीस, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख व गावातील प्रतिष्ठित नागरिक आले परंतु नागरिकांनी तपासणीसाठी नकार दिल्याने आरोग्य विभागाला तपासणी न करताच परत जावे लागले याची माहिती तालुका आरोग्य विभाग अधिकारी आर. आर. शेख यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी येवून नागरिकांना समजूनही सांगण्याचा प्रयत्न केला परंतू गल्लीतील एकही नागरिक उपस्थित नव्हते प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मास्कचा वापर करण्याची विनंती करण्यात आली ग्रामसेवक विकास फडणवीस यांनी भेट देऊन सर्व गल्लीमध्ये औषधाची फवारणी करून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!