
किनगाव (प्रतिनिधी) किनगाव येथे अनेक वर्षापासून पोलिस स्टेशन आहे.ह्या पोलिस स्टेशनची इमारत धूळखात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या पोलिस स्टेशन अंतर्गत 80ते 85 गावाचा समावेश आहे.परिसरातील कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊन शांततेने नागरिकांनी जीवन जगावे या हेतू ने पोलिस अधिकारी अहोरात्र काम करत आहे.मात्र त्यांच्याच निवासस्थानाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने त्यांना राहण्याची पर्याय व्यवस्था करावी लागते.त्यामुळे येथील कार्य रत कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात.या पोलिस स्टेशनला कर्मचारी वर्ग दोन अधिकारी आणि 34 पोलिस आहेत.सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निवास व कर्मचारी निवास 16 आहेत.मात्र या निवासात या घडी ला कोणीच राहत नाही.कारण या निवासाची अवस्था दयनीय झाली आहे.ही इमारत पावसाळ्यात गळत असते.नवीन बांधकाम पोलिस वसाहत मंजूर व्हावी याकरिता संबंधित गृह विभागाने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.पोलिस अधिकारी कर्मचारी निवास अभावी भाडे भरून खाजगी इमारतीत राहतात.प्रती महिना 6 हजार भाडे असल्याचे आढळले आहे.

