
ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा बसवलाय त्या गार्डनला पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव आहे ते नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- व्ही एस पॅंथर
कळंब ( राहुल हौसलमल) मा. मुख्याधिकारी,नगर परिषद कार्यालय कळंब. यांना व्ही एस पॅंथर यांचे निवेदन पंडित जवाहारलाल नेहरू बालोद्यान चे नाव बदलून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क असे नामांतर करा कळंब नगर परिषद कडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारणी कामाचे भुमिपुजन आ.क्र. २१ पंडित जवाहरलाल नेहरू बालोउद्यान येथे भुमिपुजन सोहळा संपन्न झाला होता. या वेळी महाराष्ट्राचे तात्कालीन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री लक्षणराव ढोबळे यांच्या सह विविध पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थिति होते. तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री मा वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण पार पडले होते. या वेळी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यान कळंब येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणी करते वेळीच कळंब नगर परिषदेने पंडित जवाहरलाल नेहरू चे नाव बदलून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे आवश्यक होते. परंतू तसे केले गेले नाही हि मोठी शोकांतिका आहे. एखाद्या ठिकाणी महापुरुषांचा पुतळा जर असेल तर त्या परिसराला चौकाला त्या महापुरुषांच्या नावाने संबोधले जाते हि वस्तुस्थित आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते हे जरी सत्य असलं तरी ते राजकीय व्यक्तिमत्व होते हे ही तितकंच सत्य आहे. देशाचे पहिले पतंप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सन्मान आहेच ,परंतु ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारलेला आहे त्याच ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा असता तर ? नाव बदलण्याचा विषयच आला नसता हे हि तितकंच सत्य आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा असतानाही त्या परिसराला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाणे उच्चारणे हे दुजाभाव व अन्यायकारक आहे.आज 13/10/ 22 आहे तरी ? मुख्याधिकारी, यांनी सदर विषयाची गंभीरता व आवश्यकता लक्षात घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू नाव बदलून भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर पार्क करावे, सदर निवेदनावर १५ दिवसाच्या आत नगर परिषद ने विचार करावा , अन्यथा व्हि. एस. पॅंथर संघटना उग्र आंदोलन करेल यावेळी कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद चे मुख्याधिकारी म्हणून आपली राहिल याची नोंद असे निवेदन तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड, शहराध्यक्ष मोजन खान, प्रशांत गायकवाड अजय कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
