
उस्मानाबाद/धाराशिव :- ( जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकिवाले.) दि.१४ आक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली,६६ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने भव्य धम्म रॅली काढण्यात आली.रॅलीत पारंपरिक पद्धतीने वाजविणारे भीम बुध्द गीते, वाद्य पथक,लेझीम पथक आणि लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग आकर्षक होता.माजी नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे,काॅग्रेसचे प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे, धनंजय राऊत व महिला भगिनी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आली.भीमनगर येथुन रॅलीस सुरुवात होऊन मारवाडी गल्ली,काळा मारुती चौक,पोस्ट ऑफिस ,संत गाडगेबाबा चौक ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला,

बौध्दाचार्य बाबासाहेब बनसोडे,गुणवंत सोनवणे,धनंजय वाघमारे, गणेश वाघमारे, निखिल बनसोडे सह सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी माजी नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे,काॅग्रेसचे प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे,धनंजय राऊत,अंगुल भाऊ बनसोडे,गणेश वाघमारे,निखिल बनसोडे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,सचिन धाकतोडे, विद्यानंद बनसोडे,प्रशांत नाईकवाडी,बाळु बनसोडे, राहुल बनसोडे,अतुल लष्करे,अन्य इतर उपस्थित होते.कार्यक्रमा शेवटी नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे व भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पोलीस प्रशासन यांचे आभार मानण्यात आले.
