
13 ते 15 ऑक्टोबर, 2022 या चाललेल्या
प्रशिक्षणातून ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून गाव समृध्द होण्यास मदत होणार
गटविकास अधिकारी किरण कोळपे

लातूर दि. 15 – ( प्रतिनिधी) प्रत्येक लाभार्थ्याला लखपती व गावाला समृद्ध करता येईल, यासाठी अशी परिपूर्ण तीन दिवसीय प्रशिक्षण ग्राम रोजगार सेवकांना देण्यात आले. यातून ग्रामरोजगार सेवकांना याचा फायदा होणार असल्याचे व गाव समृद्ध होण्यास मदत होईल असे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी सांगितले. लातूर पंचायत समिती येथे समितीच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत ग्राम रोजगार सेवक यांच्यासाठी दि. 13 ते 15 ऑक्टोबर, 2022 या तीन दिवसाच्या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक म्हणून हिंगोली येथील उदयकुमार उपवार, नांदेड येथील संदिप बेंद्रे हे उपस्थित होते. प्रशिक्षक म्हणून हिंगोली येथील उदयकुमार उपवार, नांदेड येथील संदिप बेंद्रे यांनी ग्रामरोजगार सेवकांना गाव कसे समृध्द करुन गावाचा विकास साधता येईल याबाबतचे खूप सखोल असे प्रशिक्षण दिले त्याबद्दल ग्रामरोजगार सेवकानी आभार मानले. पहिल्या दिवशी लातूर पंचायत समिती येथील सभागृहामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी लातूर तालुक्यातील नागझरी या गावी नरेगा अंतर्गत सूक्ष्म आराखडा व शिवार फेरी करून गावातील कामांचा आराखडा तयार करण्यात आला तसेच तिसऱ्या दिवशी ऑनलाइन ची माहिती ग्राम रोजगार सेवकांना देण्यात आली व ग्रामरोजगार सेवकांचे अडचणी त्यांचे मनोगत इत्यादी बाबी घेण्यात आल्या तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्व ग्राम रोजगार सेवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी किरण कोळपे तसेच विस्तार अधिकारी साचने , नरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी काकासाहेब जाधव, प्रतीक्षा कलवले, तांत्रिक सहाय्यक संपत माने, वीरभद्र हिरेमठ, गणेश पाटील, सुनील श्रृंगारे, ऑपरेटर गणेश गायकवाड, पृथ्वीराज कोल्हे, तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रोजगार सेवक उपस्थित होते. यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
