
पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रधान
कळंब ( राहुल हौसलमल) – सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्यांची निवड आधी करण्यात आली आहे. कळंब पोलीस स्टेशनचा सर्वात प्रथम क्रमांक लागला आहे. कळंब :-विविध ठाण्यांमधील निकोप स्पर्धा वाढीस लागावी, हाच उद्देश असतो. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध, दोषसिद्धी यात सुधारणा व्हावी, याकरिता जिल्हा पातळीवर पोलीस ठाण्यांची निवड करण्याबाबतचा उस्मानाबाद जिल्हा स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत करण्यात येते. या प्रक्रियेत जिल्ह्यातील ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवणे, गुणवत्ता वाढवणे, दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट रितीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हा तपास आदी हेतू साध्या करण्यासाठी जिल्हापातळीवर सर्वोत्कृष्ट कळंब पोलीस ठाण्यांची निवड करून सदर पोलीस ठाण्यांना सन्मान चिन्ह श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते कळंब पोलीस स्टेशनचे पीआय खनाळ यांना देण्यात आला.
