उस्मानाबाद ( श्रीकांत मटकिवाले) प्रिय नागरिक बंधु भगिनींनो, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उस्मानाबाद शहरातील नागरिकांचा सहभाग हा अतिशय मोलाचा आहे.कोणतेही अभियान हे आपल्या साथीनेच यशस्वी होऊ शकते.आपले शहर हे स्वच्छ व सुंदर शहर आहे, त्यास आणखी सुंदर आणि स्वच्छ बनविण्यासाठी आपण चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद उस्मानाबाद करीत आहे
आपल्या घरी ओला व सुका कचरा वेगळा करा.

कचरा घंटागाडीतच टाका.
- सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता घंटागाडीत टाका.
सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवा.
इतरांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन करुन कचरा विलिगीकरणास विषयीची माहिती द्या.
जो कुजतो तो ओला कचरा
जसे की भाज्यांची देठे, वाढलेले गवत,आंब्याची कोय,खरकटे अन्न,फळांच्या साली,पाने,फुले इत्यादी.

- घातक कचरा
घातक प्रकारचा कचरा कचऱ्यात असल्यास तो वेगळा द्यावा. - जो कुजत नाही तो सुका कचरा
रबर पाईप,रद्दी,वायर,सीडी, प्लॅस्टिक,लोखंडी वस्तु,चष्मा, जुन्या फाईल्स,रिकामी खोकी इत्यादी.
कचरा ही एक अशी समस्या आहे जी ओली हवा,पाणी, जमीन एकाच वेळी प्रदुषित करते आणि मलेरिया डेंगु सारखे धोकादायक आजार अस्वच्छतेमुळे पसरतात, म्हणुन कचरा हा घंटागाडीतच वेगवेगळ्या करुन टाकावा.

- कॅरीबॅगचे दुष्परिणाम
कॅरीबॅग जमिनीत नष्ट होण्यास वर्षानुवर्ष कालावधी लागतो त्यामुळे जमीन नापीक होते.
पाणी जमिनीत न झिरपल्याने कॅरीबॅग असलेल्या ठिकाणी घाण, ब्लॉकेज,दुर्गंधी पसरते. - दंड :- कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापारी,नागरिकांना रुपये 5000 चा दंड आकारला जाईल.
गरज राहिल वास्तवतेची..
नागरिकांनी घरपट्टी,नळपट्टी,पाणीपट्टी वेळेत भरुन नगर परिषदेस सहकार्य करावे.
पाणी आणि विजेची बचत करा
असे आवाहन श्री.हरीकल्याण यलगट्टे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.
