Spread the love

लातूर (दिपक पाटील) – पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो , समाजात घडत असलेल्या चांगल्या वाईट घडामोडींना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एक पत्रकार आपल्या लेखनीतून करतच असतो . आपले लिखाण करत असताना काही जण नाराज होतात तर काही जणांना कडून प्रशंसाही होते. मात्र एखादा कायद्याचा जबाबदार अधिकारी जर बातमी प्रकाशित केली म्हणून सुडबुदद्धीने, आपल्या पदाचा गैरवापर करून त्या पत्रकारावर चक्क गुन्हा दाखल करतो, तुम्हाला कोणी सांगितले , तसा ठाण्यात येवून जबाब द्या असे सांगत असेल व पत्रकारावर दबाव टाकन्याचा प्रयत्न करत असेल तर ते निषेधार्ह आहे. असाच प्रकार एका पोर्टलचे संपादक यांना आला आहे, डीएसपी न्यूज या वेब पोर्टलच्या संपादक दीपक पाटील यांना आला आहे, त्यांना काही कर्मचारीवर्ग व रयत बाजारात घडत असलेल्या चालू घडामोडी बद्दल माहिती काढत असताना रेणापूर येथील २४ बॅग गोवा गुटखा विक्री लातूरमध्ये झालेली आहे अशी माहिती मिळाली असल्याने त्यांनी माहितीच्या आधारे गुटखाप्रकरणी कर्मचारी ची हात की सफाई म्हणून बातमी प्रसिद्ध केली त्या बातमी वरून खात्यामध्ये एकच खळबळ उडाली व चर्चेचा विषय बनला व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याच्यात लक्ष देऊन चौकशी करण्यास सुरुवात केली, मग त्याबाबतची चौकशी करण्याचे सोडून ते पत्रकारांनाच विचारतात की तुम्हाला कोणी सांगितले ? साहेब तपास तुमच्याकडे असतात आमच्याकडे नसतात आपल्या कडेच गोपनीय खबरे असतात त्यांना लावा कामाला व त्यात काही तथ्य असेल तर कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा सदर बातमीत काही तथ्य आढळले नाही असे आम्हाला सांगा आम्ही ते प्रसिद्ध करू, या मध्ये वरिष्ठाकडून चौकशी समिती तयार करून रेणापूर पोलिसांनी पकडलेला गुटखा लातूरमध्ये कुठे आला व कोणाकडे आला? किती विक्री झाली व त्यांना गुटखा कोणी दिला याची जर चौकशी झाली तर ती कारवाई पूर्ण होईल, परंतु सदर प्रकरणीं चौकशी करण्याचे सोडून पत्रकरावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु पत्रकारावर दबाव न करता सदरील प्रकरणाची चौकशी करावी.आमच्याकडे फक्त सूत्रांच्या माहिती नुसार आम्ही काही बातम्या प्रसारित करत असतो पण बातमी प्रसारित केले की त्यामध्ये काहीतरी गोलमाल आहे हे निश्चित असते पण
यांच्यावरील आपला वचपा काढण्यासाठी पञकारावर अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात येईल असे जर होत असेल तर साधारण जनतेंनी न्यायाची मागणी कोणाकडे करायची हा प्रश्न पडतो. गुटखा तस्करी पकडलेले कंटेनर, जिल्ह्यात अनेक
ठिकाणी होत असलेले अवैध चालणारे धंदे याचा भांडाफोड
करण्याचा प्रयत्न जर एक पत्रकार म्हणून केला
तर याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का ?
हे आपणच ठरवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!