उस्मानाबाद /धाराशिव 🙁 श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ राजाभाऊ गलांडे यांना नियुक्ती करण्यात आल्याबद्दल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने त्यांना पुष्प गुच्छ व पेढे देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.जनसामान्यांच्या आरोग्य हितासाठी झटणारे, मनोभावे सेवा करणारे कर्तव्यदक्ष डाॅक्टर म्हणुन श्री. गलांडे यांची ख्याती अवघ्या जिल्ह्याच्या बाहेर देखिल आहे,असे मनोगत रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ यांनी व्यक्त केले.शुभेच्छा देतांना रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,मिशन वात्सल्य समन्वयक समिती सदस्य गणेश वाघमारे,सचीन चौधरी,ब्रदर अब्दुल रौफ शेख,वैद्यकीय अधिकारी डॉ. सचीन देशमुख,डॉ.प्रफुल्ल धाबेकर,डॉ.खुणे,डॉ.महेश पाटील,डॉ.कैलास घाडगे, डॉ.कोठावळे,वडजे,अन्य इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
