Spread the love

शिरूर ताजबंद : (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील इनडोर स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या वरिष्ठ पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अहमदपूर येथील एलआयसीचे अधिकारी प्रल्हाद होळंबे आणि पुणे येथील आयटी अधिकारी अंबादास माने यांचा संघ प्रथम आला तर या स्पर्धेत श्री महेश विद्यालय शिरूर ताजबंद येथील सह शिक्षक प्रा. मनोज देशपांडे आणि धनाजी इर्बतनवाड यांचा संघ द्वितीय आला. या स्पर्धेत एकूण आठ संघानी सहभाग नोंदवला होता.
आज भारताचे महान खेळाडू हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन अड. धनराज पाटील म्हाळंगीकर यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण प्रा. अनिल टेकाळे,नांदेड विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ जाधव, लक्ष्मण येलमटे, राहुल तेलगाणे, गणेश देशपांडे, मल्लिकार्जुन स्वामी, ईश्वर भुतडा, विश्वंभर गाढवे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!