
.
लातूर – (प्रतिनिधी) दि 30-08- 2021 लातूर येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघ लातूर येथील कार्यालयाचे उद्घाटन डॉ.बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ , महाज्योती चे संचालक व राज्य मागासवर्ग आयोग याचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता लातूर येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन डॉ. बबनराव तायवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ऍड.श्री माधव कोळगावे, उद्घाटक.मा. डॉ. बबनराव तायवाडे ,प्रमुख उपस्थिती , श्री शरद वानखेडे रा.सह. सचिव, श्री सुभाष घाटे राष्ट्रीय युवा.अध्यक्ष, श्री राजकुमार घुले. रा. यू. महासचिव, राज्य समन्वयक श्री विजयकुमार पिनाटे,सुदर्शन बोराडे प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, प्रमुख उपस्थिती होती. श्री डॉ.बबनराव तायवाडे साहेबांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ लातूर तर्फे भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला हा सत्कार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या यशा निमित्य करण्यात आला 26 जुलै 2021 रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कार्यकारिणीची बैठक व संमेलन पार पडले या बैठकीत लातूर येथील कर्मचारी महासंघाचे राज्य समन्वयक श्री विजयकुमारजी पिनाटे ही उपस्थित होते. ओबीसीच्या दहा मागण्यापैकी दोन मागण्या मान्य झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला लातूर राष्ट्रीय ओबीसी महासंघ व युवा महासंघ व कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आला सर्वात मोठी मागणी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील 27 टक्के आरक्षण मिळाले ही ओबीसी महासंघाचे खूप मोठे यश आहे याबद्दल हा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास सर्व ओबीसी बांधव उपस्थित होते.श्रीनिवास आकनगिरे जिल्हाध्यक्ष लातूर,श्रीकांत मुद्दे युवा कार्याध्यक्ष मराठवाडा,भाऊसाहेब शेंद्रे बारा बलुतेदार मराठवाडा अध्यक्ष,आनंद चौधरी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय ओबीसी पिछडा संघटना, श्री हिरालाल पाटील कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष लातूर,दिलीप पिनाटे शहराध्यक्ष लातूर, विजय टाकेकर युवा जिल्हाध्यक्ष,संजय चोरमोले, संजय शिरसागर,राष्ट्रीय ओबीसी महिला कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष रेखा सुडे, जिल्हा सचिव संगीता कानडे.राज्य सल्लागार सुनिता पोटे.विद्या चिंते महिला सदस्य,संगीता गोमारे,अंजली चन्नागिरे,. इत्यादी सर्व ओबीसी बंधू व भगिनी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
