
औसा : (विलास )औसा तालुक्यात बेलकुंड तावशी, उजनी, आलमला,बिरवली, शिवली, हिप्परगा या भागात आज दिनांक२९ रात्री 12 वाजल्यापासून आज दुपारी दोन पर्यंत पाऊसाची रिमझिम सुरु होती कधी मोठा तर कधी रिमझिम पाऊस येवून पिकाला संजीवणी मिळाली आहे आज दिवसभर आभाळात ढग असल्यामुळे सुर्य दर्शन ही झाले नाही
हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल दुपारी , रात्री १० वाजल्यापासून लातूर जिल्ह्यात विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह झाला आहे. यामध्ये औसा तालुक्याच्या तपसेचिंचोली, गाडवेवाडी शिवारातील मूग, उडीद, आणि सोयाबीन व जनावरांसाठी चारा खाद्याचे पीक उभं आहे.
मूग
आणि उडीद पीक काढणीच्या स्थितीत आहे, पण या पडलेल्या पावसाने नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. औसा तालुक्यातील तपसे चिंचोली, गाडवेवाडी या गावासह किमान ५ ते ६ गावाच्या शिवारातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गावातील राजेश्वर पाटील याचे ७ ते ८ एकर ऊस तर माधवराव पाटील याचे ६ एकर ऊस पावसाने अक्षरशः आडवा झाला आहे.
औसा तालुक्यात तेरणा नदी असून, ऊस पिकाचे क्षेत्र मोठे आहे. सध्याला ऊस, मूग, उडीद आणि जनावरांच्या चाऱ्याचे पीक अक्षरशः मोडून पडली आहेत. उसाच्या लागवड, खत, मजुरी याकरिता शेतकरीवर्ग मोठा प्रमाणात खर्च केला होता. पण एका रात्रीतून झालेल्या, पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अस्मानी संकटात औसा तालुक्यातील शेतकरी अडकला असून, शासनाने मदत देण्याची गरज आहे.
