
लातूर :- { प्रतिनिधी} दिनांक 19/10/2021 रोजीचे 2200 ते 20/10/2021 रोजी 0600 च्या दरम्यान हरंगुळ (खु) शिवारात गट नं. 111 वेअरहाऊस बार्शी रोड, लातूर इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस प्रा.लि. शाखा लातूर कंपनीचे वेअरहाऊसचा पत्रा कापून आत प्रवेश करून यातील लॉकरमध्ये ठेवलेली एकूण रक्कम रू.12,32,694/- लॉकर,डिव्हीआर व राऊटरसह कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे वगैरे फिर्यादीवरून पो.ठा.एम.आय.डी.सी. गुरनं 664/2021 नुसार कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्हा उघडकीस आणने कामी श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, लातूर, श्री.अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक, लातूर, श्री.जितेंद्र जगदाळे उप विभागीय पोलीस अधीकारी लातूर शहर याचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांनी गुन्ह्यातील अरोपीच्या शोधकामी स्थानिक गुन्हेचे पथक तयार करण्यात आले. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्ह्याच्या पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाले वरून मौजे पेडगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथुन संशीयत अरोपी नामे
1) भरत लक्ष्मण नागरे, रा.बोरगाव ता.करमाळा, जि.सोलापूर
यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केले असता सदर गुन्हा त्याच्या इतर साथीदार नामे
2) रायचंद परमेश्वर धाकतोड, रा.विट ता.करमाळा जि.सोलापूर.
3) परशुराम संभाजी घोडके, रा.पेडगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
यांनी मिळुन पो.ठा.एमआयडीसी येथील हरंगुळ (खु) शिवारात गट नं. 111 वेअरहाऊस बार्शी रोड, लातूर इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस प्रा.लि. शाखा लातूर कंपनीचे वेअरहाऊसचा चोरी केल्याची कबुली दिली.सदर आरोपीतांच्या ताब्यातुन १ पांढऱ्या रंगाची इंडीगो कंपनीची कार, १ पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप, ४ मोबाईल, गुन्ह्यात चोरीस गेलेली तिजोरी व रोख रक्कम रू.2,97,000/- असा एकुण रू.11,38,000/- रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे सपोउपनि संजय भोसले, पोह राजेंद्र टेकाळे, राम गवारे, सुधिर कोळसुरे, पोना नवनाथ हसबे, योगेश गायकवाड, यांचा सहभाग होता.त्या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले त्यांची टीम,सपोनि सुरज गायकवाड व त्यांची टीम यांनी परिश्रम घेतले, सदर गुन्हाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यातील करीत आहे. #DSPNEWS
